Top News |आजच्या टॉप 10 बातम्या | महाराष्ट्र व देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा…. दिनांक : 7 एप्रिल 2025

Top News | 1. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण तापलं! सुप्रिया सुळेंचा 48 तासांचा अल्टिमेटम

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती तनिषा भिसे यांना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप आहे. राज्य महिला आयोगाच्या अहवालात रुग्णालयाकडून उपचारात अक्षम्य विलंब झाल्याची गंभीर बाब स्पष्ट झाली. खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेला 48 तासांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.


2. “मी रुग्णालयाची बाजू घेतलेली नाही” – मेधा कुलकर्णींचा खुलासा

या प्रकरणावर खासदार मेधा कुलकर्णींनी स्पष्टीकरण देताना सांगितलं, “अनामत रक्कम घेतली जात नाही असं मी म्हटलं नाही. पत्रात मी रुग्णालयाची बाजू घेतलेली नाही.” त्यांनी आपल्या वरिष्ठांवर विश्वास असल्याचेही म्हटलं.


3. बदलापूर फेक एन्काउंटरवरून अनिल देशमुखांचा थेट आरोप

उच्च न्यायालयाने बदलापूर फेक एन्काउंटरप्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपशी संबंधित व्यक्तींना वाचवण्यासाठीच हा बनावट एन्काउंटर झाला का, असा सवाल उपस्थित केला.


4. मुंबईत 11 कोटींच्या मेफेड्रोनसह खलनायक अटक

वसईत पोलिसांनी मोठी कारवाई करत 11.58 कोटींचं मेफेड्रोन ड्रग्स जप्त केलं. विशेष म्हणजे, आरोपी नायजेरीयन नागरिक काही हिंदी व साऊथ चित्रपटांत खलनायकाच्या भूमिका करत होता.


5. कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; अटक होण्याची शक्यता

शिवसेनेविरोधातील गाण्यामुळे कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अटकपूर्व जामिनाची मुदत संपल्यामुळे त्याला अटक होण्याची शक्यता आहे. कामराने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.


6. उत्तर प्रदेशमध्ये ’80-20′ विरुद्ध ’90-10’ची निवडणूक रणनीती

2027च्या यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथ ’80-20′ फॉर्म्युल्यावर, तर अखिलेश यादव ’90-10 PDA’ फॉर्म्युल्यावर विश्वास ठेवून रणनीती आखत आहेत. जात, धर्म, अल्पसंख्याक, दलित आणि मागासवर्गीय यांचा समीकरणात समावेश.


7. पिंपरी चिंचवडमध्ये भीषण आग; फ्लॅटमध्ये अडकल्याची भीती

कुंजबन सोसायटीच्या नवव्या मजल्यावर भीषण आग लागली असून काही रहिवासी आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल.


8. सोलापूर बाजार समिती निवडणूक बिनविरोध? काँग्रेस नेत्याच्या भूमिकेने खळबळ

माजी आमदार दिलीप माने यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी दाखवली. भाजप जबाबदारीने उमेदवार दिल्यास हरकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं.


9. शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 2500, निफ्टी 1000 अंकांनी खाली

अमेरिकेच्या नवीन टॅरिफ धोरणाचा फटका भारताच्या शेअर बाजाराला बसला आहे. दिवसाची सुरुवातच मोठ्या घसरणीने झाली. गुंतवणूकदारांमध्ये चिंता पसरली आहे.


10. वक्फ विधेयकावर सर्वोच्च न्यायालयात नवा याचिका अर्ज

वक्फ बोर्डाच्या नवीन विधेयकाविरोधात समास्था केरळ जमीयथुल उलेमा संघटनेने सर्वोच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल केली असून, विधेयकाची घटनात्मक वैधता आव्हानित केली आहे.

Leave a Comment