Top 10 News Uddhav Thackeray | महाराष्ट्र व देशातील आजच्या 10 महत्त्वाच्या घडामोडी

Top 10 News Uddhav Thackeray | 1. ठाकरे गटाचा केंद्रावर सवाल : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद

मालवणमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने केंद्र सरकारवर आणि अदानी समूहावर सवाल उपस्थित केला आहे. “महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा नेमका कुणाला खटकतो?” असा रोखठोक प्रश्न ठाकरेंनी विचारला आहे.

2. अजित पवार यांचा इशारा : “दोन नंबरवाल्यांना सोडणार नाही”

परभणी दौऱ्यावर असताना अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पक्षातील प्रत्येक पदाधिकारी स्वच्छ आणि निर्व्यसनी असावा. “जर कोणीतरी दोन नंबरच्या व्यवहारात असेल तर त्याला टायरमध्येच घालीन,” असा इशारा अजित पवारांनी दिला.

3. फडणवीसांचा ठाकरे गटावर निशाणा : युद्धाच्या काळात राजकारण नको

Top 10 News Uddhav Thackeray | देशात अलीकडे घडलेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून फडणवीसांनी शिवसेना (ठाकरे गट) वर निशाणा साधला. “देशावर संकट असताना राजकारण करणं ही परंपरेच्या विरोधात आहे. जनता अशा वागणाऱ्यांना माफ करणार नाही,” असे फडणवीस म्हणाले.

4. साताऱ्यात महेश शिंदे वि. शशिकांत शिंदे संघर्ष पेटला

Top 10 News – Uddhav Thackeray | साताऱ्यात बिल्डर गुरुनाथ चिंचकर आत्महत्याप्रकरणी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप केले. यावर प्रत्युत्तर देताना शशिकांत शिंदे यांनी देखील तीव्र शब्दात इशारा दिला.

5. बीड जिल्ह्यातील मल्टिस्टेट घोटाळा सीआयडीकडे

बीडच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून थेट सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. हजारो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, तपास अधिक गतीने होणार आहे.

6. अमरावतीतील 118 पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व मिळण्याची शक्यता

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अमरावतीत वास्तव्यास असलेले 118 सिंधी हिंदू पाकिस्तानी नागरिक भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे.

7. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची पोकळ धमकी

सिंधू जल करार स्थगित झाल्याने पाकिस्तानतर्फे भारताला पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताने पाणी थांबवले तर पूर्ण ताकदीने उत्तर देऊ असे सांगितले.

8. महाराष्ट्रातील पोलिसांवर वादग्रस्त विधान

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिस विभागाबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. “महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम विभाग जगात कुठेही नाही,” असे त्यांनी म्हटले, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

9. जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई

जालन्यातील अंबड तालुक्यात अवैध वाळू उपसावर मोठी कारवाई करण्यात आली. सुमारे 3 कोटी 36 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

10. एल्फिस्टन पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला

मुंबईतील एल्फिस्टन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र स्थानिक आंदोलकांच्या दबावामुळे हा निर्णय मागे घेतला गेला असून आता पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे.

Leave a Comment