Top 10 News Sushma Andhare | 1. सुषमा अंधारे यांचा संताप : “फडणवीसांनी तातडीने संजय शिरसाटांचा राजीनामा घ्यावा”
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या सूनविषयीच्या प्रकरणावरून शिरसाट यांनी महिलेला धमकावल्याची शक्यता असल्याचा आरोप करत अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांचा तातडीने राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.
2. वैष्णवी हगवाणे आत्महत्या प्रकरण : आरोपींच्या मदतीप्रकरणी पाचजण न्यायालयीन कोठडीत
पुण्यातील वैष्णवी हगवाणे आत्महत्या प्रकरणात फरार आरोपी राजेंद्र हगवाणेला आसरा दिल्याप्रकरणी काँग्रेस नेते वीर कुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटीलसह पाचजणांना पुणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
3. ‘घरात न्याय न देणारे मंत्री समाजाला काय देणार?’ – अंजली दमानिया यांचा सवाल
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर वैयक्तिक प्रकरण दडपण्याचा आरोप केला आहे. ‘हा पर्सनल मॅटर’ म्हणणं चुकीचं असून, हे प्रकरण सामाजिक आहे, असं दमानिया म्हणाल्या.
4. लाच प्रकरणात निवासी उपजिल्हाधिकाऱ्याला अटक – एसीबीची कारवाई
छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 लाखांची लाच घेताना निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना अटक करण्यात आली आहे. 23 लाख आधी घेतल्यानंतरही अधिक 18 लाखांची मागणी करण्यात आली होती.
5. शेतीचे वाटणीपत्र फक्त ५०० रुपयात – मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
महसूल विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देत शेती वाटणीच्या दरात मोठी कपात केली आहे. यापुढे रेडीरेकनरच्या 1% ऐवजी फक्त 500 रुपयांत शेती वाटणी करता येणार आहे.
6. प्रताप सरनाईकांची नोटीस : भाजप जिल्हाध्यक्षाला २१० कोटींचा मानहानीचा इशारा
मीरा-भाईंदर भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी केलेल्या आरोपांवरून मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने ॲड. राजदेव पाल यांनी नोटीस पाठवली असून, ७२ तासांत माफी न मागल्यास २१० कोटींचा दावा ठोठावणार, असा इशारा देण्यात आला आहे.
7. नाशिकमध्ये गर्भपात प्रकरण : नर्स सासूने घरातच केला सुनेचा गर्भपात
नाशिकमधील आडगावमध्ये सुनेचा छळ करून सासूने घरातच गर्भपात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने चार जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
8. अजित पवार – अमित शाह बंद दरवाज्याआड चर्चा, राजकीय भूकंपाचे संकेत?
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सह्याद्री अतिथीगृहात 20 मिनिटांची गुप्त बैठक झाली. या बैठकीमागील नेमकं कारण गुलदस्त्यात असलं तरी त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
9. मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, मेट्रो सेवा ठप्प – रेल्वे अद्याप विस्कळीत
मुंबईत कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे वाहतूक यंत्रणा कोलमडली होती. वरळीच्या मेट्रो स्थानकात पाणी शिरल्याने मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली आहे. हवामान विभागाने आज येलो अलर्ट दिला आहे.
10. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दावा : भारत आता चौथी मोठी अर्थव्यवस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 11 वर्षांच्या कारकिर्दीत भारताने 11व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर झेप घेतल्याचा दावा केला. “विकास हेच आपले ध्येय आहे,” असं त्यांनी म्हटलं.