Top 10 News | 1️⃣ नाशिकमध्ये हॉटेल व्यवसायिकाचे धक्कादायक अपहरण!
Top 10 News | नाशिकमधील काठे गल्ली सिग्नलजवळ हॉटेल व्यावसायिक निखिल दर्यानानी यांचे स्वतःच्या गाडीमध्ये बंदुकीच्या धाकाने अपहरण झाले. 15 लाखांची खंडणी मिळाल्यानंतर ते अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळाले. मुंबईनाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून नाशिक पोलीस सतर्क झाले आहेत.
2️⃣ पुणे : दीनानाथ रुग्णालयाविरोधात भाजप महिला कार्यकर्त्यांची तोडफोड; गुन्हा दाखल
तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेवर संतप्त होऊन भाजप महिला कार्यकर्त्यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. डॉक्टरांनी 10 लाखांचे डिपॉझिट मागितल्याचा आरोप. अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
3️⃣ नीलेश लंके यांची मागणी फळाला; बिबट्यांसाठी संरक्षित क्षेत्र उभारण्याची घोषणा
अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबट्यांच्या हल्ल्यांवर उपाय म्हणून केंद्रीय वन मंत्री भूपेंद्र यादव यांनी संरक्षित क्षेत्रासाठी 500 एकर जमीन तटबंदीत करण्याची ग्वाही खासदार लंके यांना दिली.
4️⃣ नांदेड अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत – PM मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडमधील ट्रॅक्टर अपघातातील मृत्यूंबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली.
Top 10 News | 5️⃣ पुणे : दीनानाथ रुग्णालयाच्या प्रकरणावर चौकशी समितीची घोषणा – फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनाक्रमाची गंभीर दखल घेत पुण्यात चौकशीसाठी समिती गठीत केली असून, विविध खात्यांचे अधिकारी या समितीत सहभागी असतील.
6️⃣ वंचित आघाडीकडून दीनानाथ हॉस्पिटलबाहेर रास्ता रोको
दीनानाथ हॉस्पिटलच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा.
7️⃣ मनोज कुमार यांचे निधन; अजित पवार यांच्याकडून शोक व्यक्त
‘भारत कुमार’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते मनोज कुमार यांचे 87 व्या वर्षी निधन. अजित पवार यांनी भारतीय सिनेसृष्टीतील एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली.
8️⃣ मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा; पोलीस बंदोबस्त वाढवला
मुंबई पोलिसांना दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली असून संपूर्ण शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन.
9️⃣ वक्फ सुधारणा विधेयकावर काँग्रेस सुप्रीम कोर्टात
लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला काँग्रेसने कोर्टात आव्हान देण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती जयराम रमेश यांनी दिली.
🔟 सातबारा कोरा कुठंय? – राजू शेट्टींचा फडणवीसांना सवाल
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी फडणवीस यांची जुनी व्हिडीओ क्लिप सभेत वाजवत “आमचं कर्ज कधी माफ होणार?” असा थेट सवाल सरकारला केला.