Top 10 Maharashtra Live News | 1️⃣ “राजकीय कुरघोड्याच सरकारचं एकमेव काम” – रोहित पवारांचा हल्लाबोल
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्याही कार्यक्रमात राजकीय कुरघोड्या झाल्या, हे दुर्दैवी असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली. त्यांनी म्हटलं की, “सरकारने किमान कुठं राजकारण करावं याचं भान ठेवावं.” उपमुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी न देणं हे स्पष्ट राजकीय डावपेच असल्याचं ते म्हणाले.
2️⃣ “पश्चिम बंगालबाबत इंडी आघाडी गप्प का?” – भातखळकरांचा सवाल
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी विरोधी पक्षांवर टीका करताना म्हटलं की, “लोकशाही आणि संविधानाच्या नावाखाली ओरडणारी इंडी आघाडी पश्चिम बंगालमधील हिंसाचाराबाबत गप्प का आहे?” त्यांनी अप्रत्यक्षपणे हिंदू समाजाला डावलण्याचा आरोप केला.
3️⃣ नवीन टोल धोरण 15 दिवसांत – नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली की, पुढील 15 दिवसांत राष्ट्रीय महामार्ग टोल संदर्भात नवीन धोरण जाहीर होणार आहे. ते म्हणाले की, “पुढील दोन वर्षांत भारतातील रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले होतील.”
Top 10 Maharashtra Live News | 4️⃣ धीरेंद्र शास्त्रींचं संभाजीराजेंवर गौरवोद्गार
बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं, “हिंदू राष्ट्र शिव्या देऊन नव्हे, तर छत्रपती संभाजीराजेंसारख्या संस्कारित मुलांच्या माध्यमातूनच बनवता येईल.” त्यांनी संभाजीराजेंच्या बलिदानाचं स्मरण करत गौरवोद्गार काढले.
5️⃣ वाल्मिक कराड प्रकरणात आर्थिक शक्तीचा दुरुपयोग – करुणा शर्मा
करुणा शर्मा यांनी आरोप केला की, “धनंजय मुंडेंविरोधातील अनेक गंभीर गोष्टी वाल्मिक कराडकडे आहेत. त्यामुळे त्याच्या ‘एन्काऊंटर’ची शक्यता नाकारता येत नाही. पैशांच्या जोरावर अनेक प्रकरणं दाबली जात आहेत.”
6️⃣ वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची सुपारी आतूनच? – तृप्ती देसाईंचा दावा
Top 10 Maharashtra Live News |भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई म्हणाल्या, “कराडच्या टीममधीलच काहीजण त्याच्या एन्काऊंटरच्या मागे असू शकतात.” निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार ही शक्यता त्यांनी व्यक्त केली.
7️⃣ उदयनराजेंची मागणी : “राजभवनाची जागा शिवस्मारकासाठी द्या”
खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबईतील राजभवनाची 48 एकर जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी वापरण्याची मागणी केली. त्यांनी सांगितलं की, राज्यपालांसाठी आठ एकरही पुरेशी आहे.
8️⃣ सोलापुरात काँग्रेस-भाजप युती; भाजप आमदाराची कबुली
अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांसोबत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत युती केल्याची कबुली दिली. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून हे पाऊल उचलल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
9️⃣ धान घोटाळा : शिरपूर केंद्रातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबन
गडचिरोलीतील 2011 ते 2025 दरम्यानच्या धान खरेदी घोटाळ्याप्रकरणी शिरपूर केंद्रातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी स्तरावरून चौकशी सुरू आहे.
🔟 फुले चित्रपटावर वाद, पण एकाही सीनवर कात्री नाही – दिग्दर्शक महादेवन
फुले चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी स्पष्ट केलं की, सेन्सॉरच्या सूचना मान्य करूनही चित्रपटातील कोणताही सीन कापण्यात आलेला नाही. त्यांनी सांगितलं की, “हा शैक्षणिक सिनेमा असून कोणत्याही वादात अडकू नये, म्हणून प्रदर्शन पुढे ढकललं.”