Mayuri Jagtap | Top 10 बातम्या ( 25/05/2025 )

1. मयुरी जगताप छळ प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांवर महिला आयोगाचा ठपका

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पुणे ग्रामीण पोलिसांवर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. राजेंद्र हगवणे यांची सून मयुरी जगताप हिच्या कौटुंबिक छळ प्रकरणात पोलिसांनी 60 दिवसांनंतरही दोषारोपपत्र दाखल न केल्याने चाकणकरांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.


Mayuri Jagtap | 2. 30 मेनंतर मान्सूनचा प्रवास थंडावणार – हवामान खात्याचा इशारा

महाराष्ट्रात जोरदार पावसाची सुरुवात झाली असली तरी, नागपूर वेधशाळेचे प्रमुख प्रवीण कुमार यांनी स्पष्ट केलं की, 30 मेनंतर मान्सूनचा वेग कमी होणार असून 15 जूनपर्यंत मान्सूनची पूर्ण दाखल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पावसाच्या लाटेमध्ये तात्पुरती विश्रांती संभवते.


3. हगवणे कुटुंबाचा आणखी एक गौप्यस्फोट – पिस्तूल परवाना मिळवताना खोटा पत्ता

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली असतानाच आता खुलासा झाला आहे की, या कुटुंबातील सदस्याने पिस्तुल परवाना मिळवण्यासाठी बनावट पत्ता दिला होता. यामुळे प्रकरण अधिक गंभीर झालं आहे.


4. फरार निलेश चव्हाणविरोधात स्टँडिंग वॉरंट

निलेश चव्हाण अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात ‘स्टँडिंग वॉरंट’ जारी केलं आहे. आता सहा विशेष पथकं त्याचा शोध घेत आहेत.


5. पुण्यातील अवैध प्लॉटिंग, उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे बावनकुळे यांचे आदेश

पुण्यातील कात्रज, कोंढवा, येवलेवाडी परिसरात वाढत्या अनधिकृत बांधकामांविरोधात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.


6. नवी मुंबई विमानतळावर इंडिगोची 79 उड्डाणं; अदानी समूहासोबत करार

इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जमध्ये करार झाला असून नोव्हेंबर 2025 पर्यंत 79 उड्डाणं सुरु होणार आहेत. यामध्ये 14 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचाही समावेश आहे. हे विमानतळ राज्याच्या विकासात महत्त्वाचं ठरणार आहे.


7. रोहित पवारांची फडणवीसांची भेट – मतदारसंघात मेडिकल कॉलेजची मागणी

कर्जत-जामखेड मतदारसंघात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लेखी मागणी केली आहे. यापूर्वी त्यांनी हसन मुश्रीफ यांनाही भेट दिली होती.


8. सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघांवर टोला – ‘ही बाई सोयीनुसार पलटते’

महिला आयोगाच्या भूमिकेवरून सत्ताधारी व विरोधी महिला नेत्यांमध्ये जुंप झाली आहे. सुषमा अंधारे यांनी भाजपच्या चित्रा वाघांवर बोचरी टीका करत त्यांना “सोयीनुसार भूमिका बदलणाऱ्या” असे म्हटले आहे.


9. कॅबिनेट बैठकीत अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा – त्वरित पंचनाम्याचे आदेश

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश देण्यात आले.


10. निर्मला गावितांचा शिंदे गटात प्रवेश – उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका

शिवसेना (उद्धव ठाकरे गट)च्या उपनेत्या निर्मला गावित यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यामुळे नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Leave a Comment