Maharashtra Top 10 politics live updates | 1. सुजय विखेंचा बच्चू कडूंवर जोरदार हल्लाबोल
प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूंनी विखे पाटील यांच्यावर मतांचे भिकारी अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना खासदार सुजय विखे यांनी “देव बच्चू कडूंना सद्बुद्धी देवो” असे टोमणे मारले. शिर्डीत अनेक वेळा विखेंबद्दल अपशब्द ऐकायला मिळतात, ही काही नवीन गोष्ट नाही, असेही त्यांनी नमूद केले.
2. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून रोहित पाटलांचा सरकारवर सवाल
पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांनी शांततेत आंदोलन केले असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. यावर रोहित पाटील यांनी सरकारवर टीका करत विचारले की, विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यास ते गुन्हा ठरतो का? प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का?
3. शिर्डीत गुन्हेगारांचा हैदोस, भरचौकात हल्ला
शिर्डीत नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांनी एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करत डोक्यात काचेची बाटली फोडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
4. सुनील तटकरे यांचा मंत्रिपदावर स्पष्टीकरण
अमित शहा यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजन घेतल्यानंतर मंत्रिपदाच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, तटकरे यांनी स्पष्ट केलं की, केंद्रीय मंत्रिपद कधीच त्यांच्या डोक्यात नव्हतं आणि सध्या त्यांना संघटन बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे.
5. राहुरी पुतळा विटंबना प्रकरणात तपासाची गती वाढली
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणाचा तपास तीन स्तरांवर सुरू आहे. आतापर्यंत ७० जणांची चौकशी पूर्ण झाली असून २५० जणांची चौकशी प्रलंबित आहे. पोलिसांनी जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
6. मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी उभारणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरेगाव येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी स्थापन होणार असल्याचे जाहीर केले. ही संस्था भारताच्या सृजनशील उद्योगाला जागतिक व्यासपीठ देईल, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे.
7. शिवसेना (उद्धव गट) नेत्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा
कांजूरमार्ग पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपविभागप्रमुख अनंत पाताडे यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करत पदावरून हटवण्यात आले आहे.
8. गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान आणि यू-टर्न
शाळांमध्ये विद्यार्थी वाढावेत हे सांगताना “जसे आम्ही पक्ष फोडतो, तसे तुम्ही विद्यार्थी फोडा” असे विधान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. नंतर हे विधान विनोदाने केल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिलं.
9. अमित ठाकरेंची शाळा-महाविद्यालयांची नावे मराठीत करण्याची मागणी
मनसे नेता अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन देत शाळा व महाविद्यालयांची नावे मराठीत लिहिण्याची मागणी केली. दुकानांच्या पाट्यांप्रमाणेच ही अट शैक्षणिक संस्थांवर लागू व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
10. रायगडावर अमित शाह, शिंदे, फडणवीस – अजित पवार मात्र भाषणाविना
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त रायगडावर आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं. मात्र, अजित पवार यांना व्यासपीठ मिळाले नाही, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.