CM Devendra Fadanvis | नागपूरमध्ये उभारणार ‘हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना’; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना ‘हेलिकॉप्टर शॉट’

CM Devendra Fadanvis | माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना नागपूरमध्ये तब्बल 8 हजार कोटींचा भव्य हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प आणत मोठा राजकीय आणि औद्योगिक ‘हेलिकॉप्टर शॉट‘ मारला आहे. नागपूरमधील टाटा एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी नागपूरसाठी आणलेला हा नवा प्रकल्प म्हणजे सरकारचा विदर्भासाठीचा मजबूत पाऊल असल्याचे सिद्ध केले.

शुक्रवारी सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागादरम्यान सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. यामध्ये नागपूरमध्ये हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारण्याची घोषणा करण्यात आली.

या कार्यक्रमाला उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, तसेच मॅक्स एरोस्पेसचे अध्यक्ष भरत मलकानी उपस्थित होते. अन्बलगन आणि मलकानी यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:

  • प्रकल्पाची एकूण गुंतवणूक: 8,000 कोटी रुपये
  • काम सुरू होण्याचा कालावधी: वर्ष 2026 पासून
  • रोजगार निर्मिती: प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मिळून सुमारे 2,000 रोजगार
  • उद्दिष्ट: पूर्णतः ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ला चालना देणे
  • महाराष्ट्रातील पहिला कस्टमायझेशन आणि पूर्ण हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प

या प्रकल्पामुळे महाराष्ट्र एरोस्पेस आणि डिफेन्स उत्पादन क्षेत्रात एक प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाईल. विशेषतः नागपूर आणि विदर्भासाठी हा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार असून, यामुळे स्थानिकांना रोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि जागतिक दर्जाच्या औद्योगिक संधी मिळणार आहेत.

फडणवीसांचं राजकीय उत्तर:
“नागपूरमधून उद्योग पळत असल्याचे सांगणाऱ्यांना मी यामुळे स्पष्ट उत्तर दिलं आहे,” असं फडणवीसांनी सांगितलं. हे विधान करत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना करारा प्रतिउत्तर दिलं आहे.

हा निर्णय नागपूरच्या औद्योगिक भविष्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे आणि राज्यातील औद्योगिक विकासाला नवा आयाम मिळणार आहे.

Leave a Comment