Top 10 news Aditya Thackeray | 1. आदित्य ठाकरेंची भूमिका स्पष्ट : “आम्ही पुढाकार घेतला, आता त्यांच्याकडून वरिष्ठांनी यावं!”
राज-उद्धव एकत्र येण्याबाबत चर्चा रंगत असताना आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेतली. त्यांनी सांगितले की, “आम्ही प्रतिसाद दिला आहे. तिकडून जर खरंच हेतू स्वच्छ असेल तर वरिष्ठांनी पुढे यावं.” त्यांनी सरकारवर टीका करत म्हटलं की, महाराष्ट्र, समाज आणि देशाच्या हितासाठी कोणीही या भ्रष्ट सरकारविरोधात खुलेपणाने येत असेल, तर त्यांचं स्वागत आहे.
2. पवन कल्याण यांची मोदींच्या समर्थनार्थ पोस्ट चर्चेत
दक्षिणातले लोकप्रिय अभिनेते व राजकारणी पवन कल्याण यांनी एक फोटो शेअर केला आहे ज्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसतात. त्यांनी मोदींना “भारताचे खरे हिरो” म्हणत त्यांच्या देशप्रेम आणि वचनबद्धतेचे कौतुक केले.
3. नांदेड महापालिकेच्या कार्यक्रमावरून खासदार रवींद्र चव्हाण आक्रमक
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी निमंत्रण न दिल्याने काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतप्त झाले आहेत. त्यांनी आयुक्तांवर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी करत विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे.
4. पंढरपूरच्या मेळाव्यात महिलांना अंगात आल्याचा प्रकार
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात वाखरी येथे अनोखी घटना घडली. ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हे गाणं वाजताच काही महिलांना ‘अंगात आल्यासारखं’ झालं आणि त्या केस मोकळे करून नाचू लागल्या. त्यामुळे मेळाव्यात एकच खळबळ उडाली.
5. सिन्नर बसस्थानकाचा स्लॅब कोसळला, जीवितहानी टळली
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बांधलेले सिन्नरमधील बसस्थानक हायटेक करण्यात आले होते. मात्र, स्लॅबचा काही भाग कोसळल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
6. वैष्णवी हगवणे प्रकरणात गुन्हेगारी तपास गडद, चव्हाणवर नवे आरोप
वैष्णवी आत्महत्येच्या प्रकरणात निलेश चव्हाण यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध बाल न्याय कायद्यानुसार नव्या कलमांची भर घातली आहे. तसेच हगवणे कुटुंबीयांचे बँकेतील लॉकरही सील करण्यात आले आहेत.
7. अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा सुरू, काँग्रेस नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नांदेडमध्ये त्यांची जाहीर सभा, उद्घाटन समारंभ तसेच वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. दरम्यान, नांदेड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि दोन माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
8. रामदास आठवले यांची नाराजी : “महायुतीत अन्याय, आघाडीत सत्ता होती”
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीवर नाराजी व्यक्त करत सांगितले की, “महायुतीत आमच्यावर अन्याय होत आहे. आघाडीच्या काळात आम्हाला सत्ता मिळत होती – मंत्रीपदे, महापौरपद, विधानपरिषद जागा मिळत होत्या.”
9. पुण्यात तिहेरी हत्या : समाजमन हादरलं
रांजणगाव येथे एक स्त्री व दोन लहान मुलांची निर्घृण हत्या करून मृतदेह जाळण्यात आले. पोलिसांनी तपास सुरू केला असून या घटनेने पुणे जिल्ह्यात खळबळ उडवली आहे.
10. मॉन्सून महाराष्ट्रात दाखल; ठिकठिकाणी पावसाचा सुरुवात
यंदा मॉन्सून राज्यात १२ दिवस आधी दाखल झाला असून राज्यात विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये पाणी तुंबू नये, यासाठी चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला सजग राहण्याचे आदेश दिले आहेत.