Top 10 Breaking News – Operation Sindoor Special Bulletin

Top 10 Breaking News | 1. ऑपरेशन सिंदूर २ : इंडिया गेट परिसर रिकामा, दिल्लीतील नागरिकांना अलर्ट

दिल्लीत “ऑपरेशन सिंदूर-२” अंतर्गत भारत सरकारने मोठा पाऊल उचलले आहे. पाकिस्तानकडून संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इंडिया गेट परिसर पूर्णतः रिकामा करण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला गेला आहे. राजधानीत सुरक्षा यंत्रणा सतर्क असून उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत.


2. कराची, पेशावर आणि क्वेटावर भारतीय हल्ले – पाकिस्तान हादरला

भारतीय लष्कराने पाकिस्तानातील कराची, पेशावर आणि क्वेटा शहरांवर अचूक हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये कराची बंदराचे मोठे नुकसान झाले असून, फैसलाबाद एअर डिफेन्स सिस्टमही उध्वस्त करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सुरक्षाव्यवस्थेवर मोठा धक्का बसला आहे.


3. भारताने लाहोर, सियालकोट आणि अवॉक्स विमान पाडले

भारताने लाहोरवर क्षेपणास्त्र हल्ला करत पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली. तसेच, सियालकोटवर हल्ला करून पाकिस्तानचे अवॉक्स रडार विमान पाडले. भारताचे सैन्य हवाई आणि स्थल युद्धासाठी पूर्ण तयारीत आहे.


4. राजस्थानातील सीमावर्ती गावे रिकामी, ५ कोटींचा तातडी निधी जाहीर

पाकिस्तानच्या सीमेपासून २० किमी अंतरावर असलेल्या राजस्थानातील गावांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सीमावर्ती जिल्ह्यांना ५ कोटी रुपयांचा तातडी निधी जाहीर केला आहे. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.


5. भारताने पाकिस्तानचे 2 पायलट पकडले, होशियारपूरमध्ये मिसाइल पाडले

भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे दोन वैमानिक (पायलट) पकडण्यात आले आहेत. पंजाबमधील होशियारपूर येथे पाकिस्तानकडून डागले गेलेले क्षेपणास्त्र निष्क्रिय करण्यात आले आहे. भारताच्या संरक्षण यंत्रणांची तत्परता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.


6. नागरी विमान वाहतूक मंत्रालय सतर्क – देशभरात एअरपोर्ट अलर्ट

ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) ने सर्व विमानतळ आणि एअरलाइन्सना अलर्टवर ठेवले आहे. प्रवाशांची दुय्यम व त्रिस्तरीय तपासणी, एअर मार्शल्सची नियुक्ती, तसेच टर्मिनलमध्ये व्हिजिटर्सवर बंदी लागू करण्यात आली आहे.


7. सीमावर्ती भागात ब्लॅकआउट – लष्कर पूर्ण अॅक्शन मोडमध्ये

पंजाब, जम्मू-काश्मीर आणि राजस्थानमध्ये सावधगिरीचा उपाय म्हणून विद्युत आणि इंटरनेट सेवा खंडित (ब्लॅकआउट) करण्यात आली आहे. भारताचे तीनही सैन्यदल (थलसेना, नौसेना आणि वायुदल) अ‍ॅक्शन मोडमध्ये आहेत. आयएनएस विक्रांतवरून समुद्रमार्गे क्षेपणास्त्र डागले गेले आहेत.


8. अमेरिकेचा इशारा – पाकिस्तानमधून बाहेर पडा

अमेरिकेने आपल्या नागरिकांना पाकिस्तान, विशेषतः लाहोर सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. लाहोरमधील विमानतळ परिसर रिकामा करण्यात येण्याची शक्यता असून अमेरिकेने नागरिकांना स्वतःची सुटका सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. जागतिक पातळीवर पाकिस्तानची परिस्थिती अडचणीत आली आहे.


9. पाकिस्तानच्या हल्ल्यांमुळे भारतात हायअलर्ट – मुंबईत पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

पाकिस्तानकडून जम्मू आणि अन्य भागांत ड्रोन हल्ल्यांचे प्रयत्न करण्यात आले. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने ८ ड्रोन पाडले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात हायअलर्ट जारी करण्यात आला असून सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.


10. ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० दहशतवाद्यांचा खात्मा – सर्वपक्षीय बैठकीत माहिती

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत, १०० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे जाहीर करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असून, भारताला मोकळं रान मिळाल्याने पुढील टप्पे अधिक प्रभावी असतील. एनएसए डोभाल, परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि पंतप्रधान मोदी हे थेट परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Leave a Comment