Top 10 News – Atul Bhatkhalkar | महाराष्ट्र टॉप 10 न्यूज अपडेट – २५ एप्रिल २०२५

Top 10 News – Atul Bhatkhalkar | 1. अतुल भातखळकरांचा राहुल गांधींवर शरसंधान
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. “स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींना न्यायालयाने फटकारले आहे. त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी सावरकरांची स्तुती केली होती, हे राहुल गांधींना माहिती आहे का?” असा सवाल करत त्यांनी गांधींवर निशाणा साधला. “शब्दांचा मार शहाण्याला असतो,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना “अशहाण” म्हणत टीका केली.

2. पहलगाममधून आणखी 232 पर्यटकांचे सुटकेनंतर मुंबईत आगमनTop 10 News – Atul Bhatkhalkar | काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिसरे विशेष विमान 232 महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन मुंबईत दाखल झाले. आतापर्यंत एकूण 800 पर्यटकांची सुटका झाली असून, अकोला व अमरावतीच्या प्रवाशांसाठी पुढील प्रवासासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्यात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले.

3. नाशिक विभागात 50 लाख अर्ज वेळेत निकाली
Top 10 News – Atul Bhatkhalkar | ‘आपली सेवा- आमचे कर्तव्य’ या लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत 55 लाख अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी 51 लाख अर्ज वेळेत निकाली काढण्यात आले. या उपक्रमाचे दहा वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने 28 एप्रिल हा ‘सेवा हक्क दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे.

4. पहलगाम हल्ल्यावरून देशात तणाव; काश्मीरमध्ये दहशतवादी चकमक
Top 10 News – Atul Bhatkhalkar | पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. दोन दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली असून, बांदीपोरा येथे झालेल्या चकमकीत दोन पोलीस जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले असून, नाशिकमधील सहा पाकिस्तानी महिलांना देश सोडण्याचे आदेश दिले जाणार आहेत.

5. राहुल गांधींचा काश्मीर दौरा
दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी श्रीनगरमध्ये दाखल झाले. ते GMC अनंतनाग येथे रुग्णांची भेट घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाने पाहिले जात आहे.

6. अहिल्यानगरमध्ये शस्त्र व जमावबंदीचे आदेश
अहिल्यानगरमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी 9 मेपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. यामुळे आगामी दिवसांत तेथे कोणतेही सार्वजनिक आंदोलन किंवा जमावबंदी होणार नाही.

7. अजित पवारांचा अजब दावा – २४ तास काम करणारे सरकार
पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकार २४ तास कार्यरत असल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, “मी पहाटे ४ वाजता काम सुरु करतो, फडणवीस रात्री ११ ते २ आणि एकनाथ शिंदे २ ते ४ काम करतात.” त्यामुळे तीन शिफ्टमध्ये काम करणारे हे सरकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

8. शिर्डी विमानतळ विस्तारीकरणास मुख्यमंत्री मंजुरी
शिर्डी विमानतळावर दोन नवीन हेलिपॅड आणि आठ वाहनतळ उभारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

9. पाटील-बाबर यांची राजकीय जुगलबंदी
सांगलीतील दोन आमदार – सुहास बाबर आणि रोहित पाटील यांच्यात एका व्यासपीठावर जोरदार शाब्दिक जुगलबंदी झाली. “व्हेरी गुड मॅन, बट इन बॅड कंपनी” या बाबरच्या टोलेला पाटील यांनी “पाच वर्षांनंतर फायनल आम्हीच मारणार” असा प्रत्युत्तर दिले.

10. शरद पवारांच्या पक्षात अंतर्गत गोंधळ; प्रवक्त्यांचे पॅनेल बरखास्त
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचे प्रवक्त्यांचे पॅनेल तात्काळ बरखास्त केले आहे. पक्षात नाराजीचे वातावरण असल्याचे सांगितले जात असून, या निर्णयामुळे नवीन घडामोडींना चालना मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment